वाशीम जिल्ह्यातील २५ क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतीचा गौरव काटा ग्रामपंचायतचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव
वाशीम क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा १३ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन भवन वाशीम येथे पार पडला. यावेळी काटा ग्रामपंचायत क्षयरोगमुक्त केल्याबद्दल प्राथमिक आरोग्य अधिकारी केंद्र वैद्यकीय अधिकारी व ग्रापं यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सर्वप्रथम जिप मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतिश परभणकर व उपस्थित मान्यवरांच्या यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतीमेस आणि रॉबर्ट कॉकच्या प्रतीमेस पुष्प वंदन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय काळे, डब्ल्यूएचओ कन्सल्टंट डॉ. नांदेकर, त्या त्या गावचे सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी सर्व, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य
सेविका, आशा सेविका आदींची उपस्थिती होती. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या वर्षात क्षयरोगमुक्त पंचायत अभियाना मध्ये कारंजा १, वाशीम ८, मालेगाव ९, मानोरा १, मंगरूळनाथ ३. रिसोड ३ अशा एकूण २५ ग्राम ग्रामपंचायतीचा महात्मा गांधीजींचा पुतळा व
प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे मार्गदर्शन करताना म्हणाले की मागील पाच महिन्यात जिल्ह्यातील आरोग्य विभाग चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यामुळे राज्यात दुसरा क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी क्षयरोगमुक्त पंचायत कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने उपस्थित सरपंच यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन डॉ. विजय काळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा कार्यक्रम समन्वयक लोणसूने व सोनुने यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.