विठ्ठल विठ्ठल विठ्ठला च्या गजरात चिमुकल्यांची पंढरीची वारी ठाई ठाई.. पालखी सोहळा
वाशीमच्या एसएमसी स्कुलचा धार्मिक उपक्रम
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी बालाजी ठेंगडे) – वाशिम येथील लाखाळा परीसरातील एस एम सी संकुलाच्या वतीने आषाढी एकादशीच्या पुर्वसध्येला दि १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पंढरीचीवारी काढुन साक्षात विठ्ठल रखुमाईची जागृत मुर्ती निर्माण केली होती. या वारीत विठ्ठलाची हुबेहूब प्रतिकृती तोरल राठी व रखुमाई प्रांजल ईढोळे यानि साकारली होती. ही पंढरीचीवारी एस एम सी संकुलाच्या प्रांगणातुन शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा हरीभाऊ क्षीरसागर आणि सचिव पुरुषोत्तम
शर्मा प्राध्यापक कॉलनी यांच्या निवस्थानी पूजा अर्चना करून वारी पुढे निरंकारी भवन, शास्त्री कॉलनी, चांडक ले आऊट, विवेकानंद कॉलनी मार्गे शाळेत परत आली. यामुळे लाखाळा परीसराला विठ्ठल दर्शन घडवले असे रस्त्याने जात असलेले नागरीक बोलत होते. पालखीच्या मार्गात जागो जागी रांगोळी, पूजा अर्चना आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या पालखी सोहळ्यात संस्थेचे सचिव श्री पुरुषोत्तमजी शर्मा आणि शाळेच्या मुख्याध्यापिका मिना उबगडे तसेच शाळेचे माजी विद्यार्थी
तथा प्रतिष्ठित व्यापारी सचिन चांडक यांची उपस्थिती होती. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुध्दा करण्यात आले. विद्यार्थिनी फुगडी खेळून आंनद साजरा केला. वारकरी दिंडी च्या यशस्वी आयोजन करिता प्रणिता हरसुले, अस्मिता वानखेडे, सुनीता बोरकर, अभिजित जोशी, स्मिता पाटील, संजय बोदडे, किरण देशमुख, संजय दळवी, युवराज कुसळकर, पवन खंडेलवाल, शैलेश केने, विशाल भंगी, रतन भालेराव इत्यादी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.