विनोद जनक व संतोष इढोळे यांचा पंचायत समिती येथे सत्कार
वाशिम – पंचायत समिती येथिल मासिक सभेत मध्ये सर्वानुमते
ठराव मंजूर करून २०२४ साठी जि.प. प्राथमीक शाळा विनोद जनक व संतोष इढोळे यांच्या अतोनात प्रयत्नाने इयत्ता ४ मध्ये नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली त्यामुळे त्यांना पंचायत समिती वाशीम येथील मासिक सभेमध्ये शुक्रवारी बोलवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वाशिम पंचायत समितीचे उपसभापती गजानन गोटे, तसेच पंचायत समिती सदस्य बळीराम माहुरे, बालाजी वानखेडे, वसंता पुंड, गजानन भुरभुरे, नारायण खोडके, दीपक खडसे, माधवराव सोळके, यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
CATEGORIES WASHIM
TAGS Hot News