शहरात १० दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सुरळीत करा
मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
वाशिम प्रतिनिधी भर पावसाळ्यात देखील शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी यांना निवेदन देवून संबंधीत पाणी प्रश्न त्वरीत सोडविण्याची मागणी केली आहे. शहरात सद्या १० दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे गोरगरीब जनतेचे
मोठे हाल होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवेदन देताना तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, शहराध्यक्ष गणेश इंगोले, शहर संघटक प्रतीक कांबळे, शहर उपाध्यक्ष राजेश भालेराव, शहर
उपाध्यक्ष सुनील इंगळे, शहर उपाध्यक्ष गोबिंद भोसले, शहर उपाध्यक्ष राजेश भालेराव, जिल्हा सचिव प्रताप नागरे शाखा अध्यक्ष विक्की डोगरे महाराष्ट्र सैनिक कैलास रौंदळे आदी उपस्थित होते