शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा – मनसे विद्यार्थी सेना आक्रमक
*शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा – मनसे विद्यार्थी सेना आक्रमक..🚩* शहराला राजकिय, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेस मोठा शैक्षणिक वारसा लाभला आहे. यवतमाळ शहरासह जिल्हयाभ-यात मोठ्या प्रमाणात शिकवणी वर्ग चालविले जात आहे. शिकवणी वर्गासाठी विद्यार्थ्याकडुन लाखो रुपये फी स्वरुपात उकळले जात आहे. शिकवणी लावली नाही तर परिक्षेत गुण चांगले मिळणार नाही, असा गोड गैरसमज पालकांसह त्यांच्या पाल्यांचा झाला आहे. याचाच गैरफायदा घेत शिकवणी वर्ग चालकाकडुन अव्वाच्या सव्वा फी उकळली जात आहे. शिकवणी वर्गावर कुठलेहि नियंत्रण शिक्षण विभागाचे नाही. त्यामुळेच दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात राजरोसपणे लुट सुरु आहे. त्या पाठोपाठ खाजगी अनुदानीत व विनाअनुदानीत शिक्षण संस्थामध्ये 11 वी, 12 वी व त्यापुढील विविध शिक्षणासाठीच नाही तर प्ले ग्रुप ते 10 वी पर्यंतच्या इंग्रजी शाळांमध्येहि वारेमाप फी घेतली जात आहे. 11 वी सह इतर शिक्षण घेण्यासाठी यादी जाहिर केली जात असली तरी मॅनेजमेन्ट कोट्यातुन मोठ्या उलाढाली अनेक संस्था चालक करित आहे. सर्वसामान्य, मध्यमवर्गीय व गरिब कुटुंबावर अन्याय करणारी हि बाब आहे. रोजमजुरी करणारे लाखो रुपये डोनेशन साठी कुठुन आणणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आपण या गंभिर प्रकरणाकडे जातीने लक्ष घालुन जिल्हयात सुरु असलेले शिक्षणाचे बाजारीकरण त्वरीत थांबवावे. तसेच शिकवणी वर्गांना व शैक्षणिक संस्थाना प्रत्यक्ष भेटी देवुन या गंभिर प्रकरणाची चौकशी करुन शिकवणी चालक व शिक्षण संस्था चालकांवर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडुन तिव्र आंदोलन केले जाईल अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना देण्यात आले, एवढेच नव्हे तर त्या नंतर सर्व मनसैनिकांनी थेट शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यवतमाळ यांचे कार्यालय गाठून त्यांना शिकवणी व संस्था चालकांच्या गैर वाजवी शुल्क वाढ व इतर प्रकरणी त्यांच्या कार्यालयात तक्रार पेटी ठेवण्यात यावी, तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर जाहीर करावा व ईमेल आयडी जाहीर करावा, भरारी पथकाकडून धाड सत्र राबविण्यात यावे, नियमाप्रमाणे किती व कशा पद्धतिने शुल्क वाढ करण्यात यावी या बाबत पत्रक काढावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या त्याला शिक्षणाधिकारी मॅडम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.प्रस्तुत निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणुन जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, शहर अध्यक्ष अॅड. अमित बदनोरे ,अमितेश आडे,अश्विन ठाकरे,गौरव दरने,प्रथमेश पाटील ,ऋषिकेश हळदे ,अंकुश कराळे ,साईराम कवडे,श्रावण गायकवाड,मिथीलेश दरने,सुमित काकड,साईराम कवडे ,सनी जतकर, शिवा राठोड,आकाश राठोड ,संकेत पवार ,योगेश चव्हाण ,कुंदन राठोड ,अभिषेक पवार ,महेश चव्हाण,अभिषेक आडे,सुमित राऊत,साहिल खांडरे,यश पांगुळ,पार्थ जमदापुरे,आयुष दिकुंट्वार,सत्यम इंगोले,विवेक ठाकरे व शेकडो मन सैनिक व नागरिक उपस्थित होते