शिक्षण सप्ताहांतर्गत उपक्रमांची रेलचेल राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य

शिक्षण सप्ताहांतर्गत उपक्रमांची रेलचेल राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य

मानोरा – तालुक्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आठवडाभर करण्यात येत असलेल्या शिक्षण सप्ताह अंतर्गत शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या आठवड्याच्या २२ तारखेपासून तर २८ तारखेपर्यंत सरकारी व खाजगी संस्थांद्वारा संचालित शिक्षण संस्थांमध्ये प्रत्येक दिवशी एका खास कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात येत आहे. बालवाडी पासून तर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधे उपरोक्त सप्ताहाचे कार्यक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते आणि भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढावे हा ह्या शैक्षणिक सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

या सप्ताहात प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे कृतिशील उपक्रम देण्यात आलेले आहेत. पायाभूत स्तरात अंगणवाडी, बालवाडी आणि पहिली व दुसरी या वर्गाचा समावेश होतो तर पूर्व तयारी स्तरात इयत्ता तिसरी ते पाचवी, पूर्व माध्यमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराकडून उपरोक्त सप्ताह तालुयातील शाळांमध्ये राबविला जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन परिषदेचे संचालक आणि शिक्षण आयुक्त यांनी जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशासकीय यंत्रणेला एक आठवडा सप्ताह राबविणे विषयी लेखी निर्देश दिलेले आहेत. शिक्षण सप्ताह अंतर्गत कृतीशील उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ चार

भिंतीच्या आतील शिक्षण न मिळता बाहेरच्या जगातील शिक्षण मिळून कौशल्य प्राप्त होणार आहे. या उपक्रमातील कौशल जाणे विद्यार्थी स्वावलंबी होऊ शकत असल्याने तालुक्यातील विविध स्तरावरील शाळांमध्ये अत्यंत प्रभावीपणे हे उपक्रम राबविले जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्हा व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शिक्षण सप्ताह प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांना आवाहन केले आहे.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )