शेतीमध्ये टॉवर उभारणी जागेच्या मोजमापास पॉवर ग्रिड कंपनीकडून विलंब
दहा वर्षापासून प्रतिक्षा : नुकसान भरपाईपासून किनखेडा येथील शेतकरी वंचित
वाशिम (प्रताप नागरे कार्यकारी संपादक) – वर्ष २०१४ मध्ये शेतात उभारलेल्या वर्धा टु औरंगाबाद १२०० केव्ही पॉवरच्या जागेचे मोजमाप करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यास पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून टाळाटाळ व विलंब होत आहे. सदर शेतीचे मोजमाप करुन शेतकर्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात व तालुका संघटक रघुनाथ खुपसे यांच्या नेतृत्वात १० जून रोजी जिल्हाधिकार्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीकडून वर्ष २०१४ साली तालुक्यातील किनखेडा येथील अनेक शेतकर्यांच्या शेतात टॉवर उभारण्यात मोजमाप व पंचनामा करुन शासनाच्या नविन जीआर नुसार मोबदला देण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर भगवान लांडकर, गणेश भालेराव, शाहीराम टेकाळे, राजु कासट, दत्ता इंगोले, नितेश खांबलकर, गजानन खांबलकर, पार्वताबाई इंगोले, लक्ष्मी लांडकर, नामदेव गायकवाड, कुंडलीक धाबे, सुनिल लांडकर, विजय लांडकर, विश्वनाथ इंगोले, माणिक इंगोले, ज्ञानेश्वर लांडकर, नामदेव खुपसे, सुभाष कासट, मंगला खांबलकर, भाऊराव खांबलकर, रघुनाथ खुपसे, कैलास लांडकर, राजेश कासट, विसांबर बुंधे, प्रकाश गायकवाड, विशाल भालेराव, बाबाराव शेळके, दिनकर पाटील आदींच्या सह्या आहेत.