श्री छत्रपती ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात
वाशिम (प्रताप नागरे कार्यकारी संपादक) जिल्हयातील शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी रक्तदान क्षेत्रात अग्रेसर असलेल्या छत्रपती ब्लड डोनर ग्रुपच्या आयोजनातून मंगळवार ११/ ०६/२४ रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित रक्तदान शिबीरात एकूण २६ रक्तदात्यांनी आपले उस्फुर्त रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले. कार्यकर्माची अध्यक्ष जिल्हा शल्य चिकीतस्क डॉ अनिल कावरखे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती वैशाली मेश्राम, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरु, उपजिल्हाप्रमुख नागोरावजी ठेंगडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष मनीष डांगे, मनसे शहर अध्यक्ष गणेश इंगोले. नॅशनॅलिस्ट कंजूमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन जिल्हा अध्यक्ष प्रताप नागरे. डॉक्टर धुळे, ह्यूमन राइट्स जिल्हा सालगार संतोष टोलमारे किशनराव धोटे अमोल धोटे संतोष ठाकरे, विनोद ठाकरे, गोविंद धोटे, शामराव धाडवे अंकुश भोपळे अमोल वानखेडे गणेश वानखेडे मंगेश वानखेडे कुणाल शिराळ वैभव बनसोड प्रवीण देशमुख हनुमान सोळंके, गोपाळ आढाव राहुल कांबळे श्याम घोडके आदींची उपस्थिती होती. या रक्तदान शिबीराचे आयोजन छत्रपती ब्लड डोनर ग्रुपचे अध्यक्ष अजय मोतीवार व सहकार्यांनी केले होते. रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम रक्तपेढीच्या तंत्रज्ञांनी सहकार्य केले.