संततधार पावसाने शेतकरीवर्ग आनंदीत

संततधार पावसाने शेतकरीवर्ग आनंदीत

मंगरुळनाथ शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस दिवसभर सुरु असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रिपरिप पावसाचा दैनदिन कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तालुयातील शेलुबाजार, शेंदुर्जना मोरे हिरंगी, लाठी, तर्हाळा, पेडगाव, नागी, इचा, दाभा, जोगलदरी मोहरी, पोटी, मोझरी, मानोरा, मंगरुळनाथ, कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशीम येथे आज पावसाने हजेरी लावली. समाधान कारक पावसामूळे आनंदी वातावरण दिसत आहे.

रिमझिम पण सततधार पाऊस सुरू असून, येत्या दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सदर पाऊस हा मुरौती पाऊस होत असल्याने त्याचा रब्बी पिकाला चांगला लाभ होणार असल्याचे शेतकरी बोलत

आहे. शिवाय परिसरातील शेततलाव, पाझर तलाव, धरणे भरण्याची देखील शयता आहे. चांगला मुसळधार पाऊस झाल्यास धरणातील जलसाठा वाढण्यास मदत होईल.

पावसाळा सुरू होऊन

दीड महिन्याचा कालावधी झाला असला तरी या काळात जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील जलसाठा अद्यापही तळाशी आहे. असाच पाऊस सुरू राहील्यास सिंचन प्रकल्प भरण्याची शयता कमी आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हावासीयांना भिषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागेल. रिपरिप पावसाने पिके बहरली, प्रकल्प तहानलेलेच

वाशीम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून रिपरिप पाऊस सुरू असून, या पावसाने पिके बहरली असली तरी सिंचन

प्रकल्पातील पाणी पातळी अद्यापही बुडावर आहे. सिंचन प्रकल्प भरण्यासाठी मुसळधार पावसाची गरज आहे. जून महिन्यात जेमतेम पाऊस पडला, त्यावर शेतकर्यांनी पेरण्या उरकल्या. रिपरिप पावसामुळे पिकांना संजीवनी मिळत असली तरी सिंचन प्रकल्प मात्र, तहानलेलेच आहेत. रिमझीम पावसाने पिकांना बहर आला असून, शेतकरी देखील आनंदीत आहे. असाच पाऊस सुरू राहील्यास आगामी काळात भिषण पाणी टंचाईची निर्माण होऊ शकते. प्रकल्प भरण्यासाठी मुसळधार पावसाची गरज आहे.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )