संत सावता माळी महाराज यांचा ७३० वा संजीवन समाधी सोहळा
वाशीम : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी
संत सावता माळी महाराज यांच्या ७३० व्या संजीवन समाधी सोहळ्या निमीत्त वाशीम येथील चंडीकावेश येथे संत सावता माळी महाराज व साईबाबा मंदीरच्यावतीने या भव्य किर्तन सोळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत सावता माळी महाराज मंदीराच्या बाजुच्या शेतात महाकाय वॉटरप्रुप मंडपामध्ये पोथी वाचन व किर्तनाचे आयोजन करण्यता आले आहे. या सात दिवसामध्ये सकाळी ६ वाजता दररोज जलाभिषेक व दुग्धाअभिषेक करुन महाआरती केल्या जाते. त्यानंतर हरीपाठ, गवळणी,
या सप्ताहामध्ये दि २७ जुलैपासुन सुरुवात झाली आहे. पहील्या दिवशी दि २७ जुलैला अर्जुन महाराज मोटे परभणी यांची किर्तन संपन्न झाले, दि २८ जुलै रोजी माउली महाराज आहुरकर यांचे किर्तन संपन्न झाले तर दि २९ जुलै रोजी ज्ञानेश्वर महाराज पठाडे याचे किर्तन, दि ३० जुलै कु. आरतीताई शिंदे महाराज सोलापुर, दि ३१ जुलै सौ सुनिताताई आंधळे आळंदी, दि १ ऑगस्ट विलास महाराज गेजगे गंगाखेड, दि २ ऑगस्ट प्ररकाश महाराज साठे बीड, दि ३ ऑगस्ट श्रीराम महाराज कुटे मायेकर, दि ४ ऑगस्ट काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ किर्तन विजय महाराज सुळे करंजीकर, दि ४ आगस्ट रोजी अखेरचा कार्यक्रम भारुड सायं ७ ते १० संतोष महाराज भालेराव लाठी व संच
यानंतर सकाळी १०.३० वाजता पोथीचे वाचन सागर महाराज पारीसकर यांच्या वाणीतुन संगीतमय पोथी सप्ताह सुरु झाला आहे. श्रवण करण्यासाठी हजारो भाविक येत आहेत. ही पोथी दुपारी ६.३० वाजेपर्यंत राहते. त्यानंतर आरती झाल्यावर
या परीसरातील अनेक भाविकभक्त दररोज एकवेळ सकाळी व सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करतात. संत सावतामाळी महाराज पालखी सोहळा दि ३ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ९ वा. पर्यंत. आयोजन केले आहे.