सहाव्या दिवशी लेखी आश्वासनाने सांगता

मानोरा – भुली ग्रामपंचायत मधे १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातून केलेली कामे कागदोपत्री दाखवण्यात आली असून, या कामात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला. त्याची चौकशी करून बेकायदेशीरपने ग्रामरोजगार सेवक प्रकाश गुलाब चव्हाण यांना कामावरून काढून टाकले याची चौकशी करावी आणि त्यांना पुन्हा कमावात घ्यावे या मागणीसाठी प्रकाश चव्हाण यांनी ५ ऑगस्ट पासून पं. स. समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.

१० ऑगस्ट रोजी गट विकास अधिकारी यांनी उपोषणकर्ते यांच्या मागण्या मंजूर केल्याने सहाव्या दिवशी या उपोषणाची

सांगता करण्यात आली. ग्रा.पं. ने भूमिगत गटार, सौचालाय, पेव्हर ब्लॉक, रस्ते काम या मधे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. तसेच रोजगार सेवक चव्हाण यांना कामावरून काढून टाकले. या प्रकरणी चौकशी करून चव्हाण यांना कामावर घेण्याची मागणी उपोषण कर्ते यांनी केली होती. माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड यांनी या प्रकरणी मध्यस्ती केली. यावेळी इंदल भोला राठोड, सरपंच प्रकाश राठोड, मनोहर राठोड, भाऊराव चव्हाण, दिलीप चव्हाण वाटोद, रोहिदास चव्हाण, प्रा. जय चव्हाण, सुदाम तायडे, पंडित जाधव, जानूसिंग राठोड, आदी उपस्थित होते.

CATEGORIES
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )