सामाजिक न्याय दिनानिमीत्त त्रुटी पुर्तता, दक्षता पथक कॅम्प व जलद सुनावण्यांचे आयोजन
वाशिम – दि. २६ जुन हा राजर्षी शाहु महाराज यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्यावतीने सामाजिक न्याय दिनानिमीत्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येते.
सामाईक परिक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. सामाईक परिक्षेनंतर उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. सदर प्रस्तावांवर समितीव्दारे तातडीने कार्यवाही होणे क्रमप्राप्त आहे. सदर
प्रकरणांची समितीव्दारे तपासणी करुन काही प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. परंतु प्रकरणांत शासननिर्णयानुसार जाती दावा सिध्द करणारे पुरेसे पुरावे जोडलेले नाहीत. अश्या प्रकरणांवर जलद गतीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. त्यानिमीत्त त्रुटी पुर्तता, दक्षता पथक कॅम्प व सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे आयोजनमध्ये विद्यार्थी व पालक यांनी सहभाग नोंदवावा. जात वैधता प्रमाणपत्रावाचून कोणाताही विद्यार्थ्यास उच्च शिक्षणापासुन वंचित राहू नये. अशी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची धारणा असल्याचे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी ज्या समिती यांनी कळविले आहे.