सा बां विभाग अकोला चे अधीक्षक अभियंता यांना सामाजिक कार्यकर्ते
चेतन इंगोले, विजय लाडुकर, प्रताप नागरे यांचे निवेदन
वाशिम – वाशिम मधील वॉर्ड न १२ मध्ये असलेल्या नंदी पेठ तोंडगाव मस्जिद च्या मागे असलेला रस्ता एक वर्ष पासून खोदून ठेवण्यात आला आहे, संडासचे पाईप भुयारी गटार उघड्या अवस्थेत आहेत रस्त्याच्या अशा दुरावस्थेमुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वृद्ध महिला व पुरुषांचे अपघात होऊन त्यांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागत आहे काही नागरिकांना कायमचे अपंगत्व आले. सदरहू रस्ता खोदून ठेवणाऱ्या व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर व ठेकेदारावर कठोर कारवाई करावी व दुखापत ग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा सा बां वि वाशिम या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या मागणीसाठी बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समिती चे जिल्हा सरचिटणीस चेतन इंगोले आणि सामाजिक कार्यकर्ते विजय लाडुकर व प्रताप नागरे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला चे अधिक्षक अभियंता श्री अविनाश धोंडगे यांना निवेदन देण्यात आले आहे.