सिंचन विहिरीचे कुशल बिल तात्काळ देण्यात यावे अन्यथा सामूहिक आत्मदहन – भगवान बोरकर शिवसेना तालुका समन्वयक
मालेगाव प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय मालेगाव येथे पैसे घेतल्याशिवाय कोणतही काम केल्या जात नाही याचा परिचय पुनश्च एकदा वडप गावकर्यांना आलेला आहे, कारण मालेगाव तालुक्यामध्ये सिंचन विहिरी प्रत्येक गावाला अंदाजे ३० ते ४० लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहेत परंतु लाभार्थ्यांनी जवळपास चार ते पाच महिन्यापूर्वीच विहिरीचे खोदकाम करून विहीर बांधली सुद्धा आहे परंतु काही अधिकाऱ्याच्या आडमुठे धोरणामुळे व पैशाच्या लालसेपोटी विहिरीच्या कुशल बिलाच्या फाईलवर दोन ते तीन महिन्यापासून फायली कार्यालयात जमा केलेला असताना सुद्धा जाणून बुजून पैशासाठी सह्या केल्या जात नाहीत आणि याकडे वरिष्ठ सुद्धा अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत आज वडप गावातील भगवान बोरकर विश्वनाथ टटाले सचिन पांडे, पांडुरंग अंभोरे विजय गायकवाड राजू गायकवाड, यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन आपले कुशल बिलाच्या फाईलवर वित्त विभागाच्या अधिकारी शिंदे मॅडम यांना सह्या करण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे आणि जर आमच्या फाईलवर सह्या झाल्या नाहीत तर आम्ही सामूहिक आत्मदहन पंचायत समिती कार्यालयासमोर करू असा इशारा सुद्धा या निवेदनाद्वारे दिलेला आहे आता गट विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यावर काय अॅक्शन घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे आणि हा विषय फक्त ग्रामपंचायत वडपचा नसून मालेगाव तालुक्यातील संपूर्ण सिंचन विहिरीच्या घरकुल च्या लाभार्थ्याचा आहे मालेगाव पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी या सर्व बाबीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत कारण जर दोन दोन तीन तीन महिने लाभार्थ्याच्या फाईल करायला पडून असतात आणि जो कोणी लाभार्थी या अधिकाऱ्यांना पैसे देतो त्याच्या फाईल तात्काळ निघतात त्यामुळे या अशा करप्टेड अधिकाऱ्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने कारवाई करावी जेणेकरून सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांना आत्मदहन करण्याची वेळ येणार नाही आणि गट विकास अधिकारी मालेगाव यांना सुद्धा याबाबतीत समज देण्याची गरज आहे असं मालेगाव तालुक्यातील नागरिकातून सुरू होत आहे.