सेतू केंद्र संचालकांचा संप


कारंजा लाड शासकीय योजनांच्या कामकाजापोटी सेतू केंद्र, सीएससी सेंटर व ग्राम पंचायत संगणक परिचालकांना देण्यात येणारी रक्कम मागील काही दिवसांपासून देण्यात न आल्याने वैतागलेल्या सेतू केंद्र संचालकांनी ८ जुलै रोजी एक दिवसाचा संप पुकारला. त्यामुळे कारंजा तालुक्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसह इतर योजनांचे काम प्रभावित झाल्याचे दिसून आले.

मागील काही दिवसांपासून सेतू केंद्र संचालकांना अतिवृष्टी, कर्जमाफी योजना, पिक विमा, नैसर्गिक आपत्ती, कर्जमुक्ती प्रमानिकरण यासह इतर अन्य कामाची रक्कम मिळाली नाही त्यामुळे सेतू केंद्र संचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत वैतागलेल्या सेतू केंद्र संचालकांनी सोमवारी ८ जुलै रोजी एक दिवसाचा संप पुकारला आणि याही नंतर शासनाने रक्कम दिली नाही तर पुढील दहा दिवसानंतर बेमुदत संप पुकारण्यात येईल. या संपात कारंजा तालुक्यातील ३७१ केंद्र संचालक सहभागी झाले आहेत. यात १२६ सेतू केंद्र संचालक, २०० सीएससी संचालक आणि ५५ ग्राम पंचायत संगणक परिचालकांचा समावेश आहे. अशी माहिती संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जीवन काळे यांनी दिली आहे

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )