हप्ते थकल्याने लाभार्थी मेटाकुटीस
मानोरा – तालुक्यातील अनुदानित घरकुल योजनेचे असंख्य लाभार्थी शासनाकडून घर बांधण्यासाठी मिळणार्या अनुदानाच्या दुसर्या व तिसर्या हफ्त्यापासून वंचित असल्याने अर्धवट बांधलेली घरे पूर्ण कसे करावेत या विवंचनेत पंचायत समिती व तहसील कार्यालयाची उंबरठे झिजवून उपरोक्त पदाधिकारी व कर्मचार्यांवर रोष काढताना दिसत आहेत. महागाईच्या काळात आर्थिकदृष्ट्या गरीब आणि सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या नागरिकांना घर बांधणे हा अवाक्याबाहेर झालेल्या काळात केंद्र शासनाकडून अनुदान तत्त्वावर प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे.
अटींची पूर्तता करणार्या तालुक्यातील लाभार्थी नागरिकांना घर उभारण्यासाठी पहिले हप्त्याचे अनुदान मिळाले असून, दुसर्या व तिसर्या हप्त्याचे पैसे केंद्र शासनाकडून उपलब्ध झालेले नसल्याने स्थानिक पंचायत समिती पदाधिकारी व अधिकारी कर्मचार्यांची गोची झालेली आहे. पंचायत समिती व तहसील कार्यालयामध्ये थकलेल्या अनुदानासाठी येर्झारा मारणार्या नागरिकांच्या रोषाला उपरोक्त पदाधिकारी अधिकार्यांना दर दिवशी नाहक सामोरे जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनुदानित घरकुल
मानोरा तालुक्यासह वाशीम जिल्ह्यामध्ये उपरोक्त योजनेचे एक हजार पेक्षा जास्त लाभार्थी आहेत. घरकुलासाठी आवश्यक शासकीय नियम व
योजनेच्या अनुदानाचा दुसरा व तिसरा हप्ता अप्राप्त असल्यामुळे मेटाकुटीस आलेल्या नागरिकांनी ऐन पावसाळ्यात घराचे बांधकाम थांबविलेले आहे, ज्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तालुक्यातील शासकीय घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तातडीने मिळण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून शासनाकडे आमचा पाठपुरावा सातत्याने सुरू आहे. थकीत हप्त्याला शासनाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती उपलब्ध होत असून मंजूर निधी तातडीने तालुक्यातील लाभार्थ्यांना मिळण्यासाठी सर्वतोपरी आमचा प्रयत्न सुरू आहे.