१५ ऑगष्ट रोजी ५० व्या उत्सव आझादी का कार्यक्रमाचे आयोजन
वाटाणे लॉन येथे कार्यक्रम :लॉयन्स क्लब वाशीमचा पुढाकार
वाशिम (प्रताप नागरे कार्यकारी संपादक) सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या लॉयन्स क्लब ऑफ वाशीमच्या वतीने संपूर्ण जिल्हयामध्ये सर्वात जास्त लोकप्रीय ठरलेला ‘उत्सव आझादी का’ हा कार्यक्रम गुरुवार, १५ ऑगष्ट रोजी वाशिम अकोला हायवेवरील वाटाणे लॉन येथे संपन्न होत असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. सिध्दार्थ देवळे, सचिव शैलेंद्र जैन, कोषाध्यक्ष डॉ. पंकज दागडीया, प्रोजेक्ट चेअरमन महाविर बडजात्या, आशिष ठाकुर, प्रविण पाटणी, मिलींद सोमाणी, पवन शर्मा, स्वप्नील भावसार, डॉ. निलेश तोष्णीवाल यांनी दिली. सदर कार्यक्रमाचे हे ५० वे वर्ष असल्यामुळे लॉयन्स क्लबच्या वतीने या विशेष कार्यक्रमाची उत्साहात तयारी सुरु आहे. लॉयन्स क्लब वाशीमच्या वतीने संस्कृतीला उजाळा देण्यासाठी राष्ट्रीय दिनी १५ ऑगष्ट रोजी माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी स्व. डॉ. शिवनारायण तोष्णीवाल स्मृती चषक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी स्व. निकेता हेमल गांधी बोरा स्मृती चषक व दिव्यांग बांधवांसाठी लॉयन डॉ. आय. जी. गंगवाल स्मृती चषक व पिपल्स चॉइस व्दारा भगवानलाल जमनलाल बाहेती उत्सव आझादी नृत्य स्पर्धा जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली आहे. १५
ऑगष्ट रोजी दुपारी १२.३० वा. प्राथमीक गट वर्ग ३ ते ६ व माध्यमिक गट वर्ग ७ ते १० या स्पर्धकांना सहभाग घेता येईल. प्रत्येक ग्रुप डॉन्सला १० मिनीटे वेळ देण्यात येणार असून नृत्य हे देशभक्ती, लोकगित, क्लासीकल, सांस्कृतिक व उदबोधक गाण्यावरच करावे लागेल. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून स्पर्धक व शाळांनी लाखाळा रोडवरील शिव इंडस्ट्रीज, महालक्ष्मी पेट्रोल पंपासमोरील आशिष फार्मसी व डॉ. बोरा हॉस्पीटल येथील कलश मेडीकल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन लॉयन्स क्लबचे प्रवक्ता आशिष ठाकुर यांनी केले आहे.