१ मे महाराष्ट्र दिन ध्वजारोहणाचा अवमान करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा
मनसे जिल्हा सचिव प्रताप नागरे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
वाशिम-१मे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांमध्ये मरा वि वि कं चे अधीक्षक अभियंता व एच र सेक्शन चे अधिकारी व कर्मचारी हे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमांमध्ये काही कारण नसताना अनुपस्थितीत दर्शवली व संध्याकाळी त्यांनी टी-शर्ट वर राष्ट्रध्वजाला सॅल्यूट मारताना फोटो काढून घेतले. असे हे गैर जवाबदार अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र दिनाबद्दल कोणत्याही प्रकारची आस्था दिसून येत नाही याप्रकरणी समाजसेवक श्री चेतन इंगोले यांनी मुख्य अभियंता अकोला झोन व जिल्हाधिकारी मॅडम वाशिम यांना निवेदन देऊन कडक कारवाई करण्याची विनंती केली परंतु हे अधिकारी महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र दिनाचा अवमान करणाऱ्या अशा गैर जवाबदार अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत त्यामुळे श्री चेतन इंगोले यांनी व्यथित होऊन मनसेचे जिल्हा सचिव श्री प्रतापभाऊ नागरे यांच्याकडे तक्रार केली की या प्रकरणात लक्ष घालावे त्यामुळे या महाराष्ट्र दिनाचा अवमान करणाऱ्या अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय गांभीयनि घेतले आहे व त्यांनी जिल्हाधिकारी मॅडम यांना या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे विनंती पूर्वक पुनश्च निवेदन सादर केले आहे जर
या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री मनीष भाऊ डांगे, जिल्हा सचिव श्री प्रतापभाऊ नागरे, शहराध्यक्ष श्री गणेश इंगोले शहर सचिव अक्षय पवार, शहर संघटक प्रतीक कांबळे उपाध्यक्ष सुनील इंगळे शहर उपाध्यक्ष गोविंद भोसले शहर उपाध्यक्ष राजेश भालेराव मोहन कोल्हे कामगार सेना चिटणीस वाशिम कामगार सेना महाराष्ट्र सदस्य श्री देशमुख व इतर मनसे पदाधिकारी तसेच समाजसेवक श्री चेतन इंगोले व विजय लाडुकर उपस्थित होते.