विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा द्या
मंगरुळनाथ नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. २ मध्ये १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच नसल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या ७ शिक्षकांची कमतरता आहे. तरी विद्यार्थ्यांना शिक्षक व भौतिक सुविधा द्याव्या अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
निवेदनानुसार येथील नगर परिषद द्वारा संचलीत शाळा क्र.२ ही अमरावती विभागातील दुसर्या क्रमांकाची १ हजार १५ विद्यार्थी संख्या असलेली व मंगरुळनाथ शहरातील गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून ओळख आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून पाल्यांच्या शैक्षणिक विकासात बर्याच अडचण येत आहेत. मुलांना शिकविण्यास शिक्षकच उपलब्ध नाही, मुख्याध्यापकांकडे चौकशी केली असता जवळपास ७ शिक्षक कमी असल्याचे सांगितले. शहरात नगर पालिकेच्या काही शाळा अश्या सुद्धा आहेत जिथे विद्यार्थी पटसंख्या कमी असून सुद्धा जास्त शिक्षक कार्यरत आहेत.
एक हजारचे वर विद्यार्थी असलेल्या शाळेत मुलांना बैठक व्यवस्था नाही, वर्ग १ ते ८ चे सर्व विद्यार्थी खाली बसतात. सदर शाळेत शौच्चालय व मुत्री घर नसल्याने विद्यार्थीनींची कुचंबना होते. शौचालय व मुत्रीघर नसल्यामुळे शाळा परिसरात बरेचदा दुर्गंधीयुक्त वातावरण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आजार बळावण्याची शयता वाढली आहे. या शाळेत एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती आदेश शाळा क्र. २ वर निघुन सुद्धा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अजुन पर्यंत शिक्षक शाळेवर रुजू होत नाही. याबाबत आमच्या मुलांच्या होणार्या शैक्षणिक नुकसानीस सर्वस्वी नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील असे ही निवेदनात नमुद आहे. न. प. शाळा क्र. २ ला आवश्यक शिलकांची पूर्तता व भौतिक सुविधा न मिळाल्यास आम्ही सर्व पालक शाळेसमोरील चौकात मुलांना सोचन घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्या निर्धार पालकांनी केला आहे. निवेदनाच्या प्रति तहसीलदार यांचे
मार्फत वरिष्ठ अधिकार्यांना पाठवण्यात आल्या आहेत.