शबरी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे आदिवासी वित्त व विकास महामंडळ
वाशिम – शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा कार्यालय यवतमाळ अंतर्गत मुख्यकार्यालय नाशिक मार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनेकरीता जिल्हयातील अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे. महिला सबलीकरण योजना (रू.२ लक्ष), हॉटेल ढाबा व्यवसाय (रू ५ लक्ष), वाहन व्यसाय (रू १० लक्ष), लघू उद्योग व्यवसाय (रू ३ लक्ष), कृषी आणि संलग्न व्यवसाय (रू ५ लक्ष), ऑटो वर्कशॉप / स्पेअर पार्ट (रू ५ लक्ष), वाहन व्यवसाय (रू १० लक्ष पेक्षा जास्त व रू१५ लक्ष पर्यंत), ऑटो रिक्षा / मालवाहू रिक्षा (रू३ लक्ष ) प्रमाणे सदर योजनेत कर्ज सुविधा उपलब्ध आहे. तरी सदर योजनेकरीता लाभाथ्यानी www.mahashabari.in या वेबसाईटवर १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यात यावे. तसेच कही अडचण असल्यास कार्यालयाच्या ९४२२९४५५१०/०७२३२ २५३१६९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शाखा व्यवस्थापक शबरी आदिवासी वित् व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालय यवतमाळ यांनी केले आहे.