कारंजा तालुक्यातील दहा हजार आठशे तेरा विद्यार्थ्यांना मिळणार शालेय गणवेश

कारंजा तालुक्यातील दहा हजार आठशे तेरा विद्यार्थ्यांना मिळणार शालेय गणवेश

कारंजा लाड शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शासकीय शाळा मधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक सन्मान रंगाच्या गणवेश देण्याची निर्णय काही महिन्यापूर्वी घेण्यात आला . या निर्णयाची यंदापासून अंमलबजावणी होणार असून यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जुलै रोजी कारंजा तालुक्यातील दहा हजार आठशे तेरा विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण केलेल्या जाणार आहेत . त्यामध्ये 147 जिल्हा परिषदचे व १४ नगरपरिषदचे अशा १६१ शाळांतील विद्यार्थ्यांच्या समावेश आहे .त्यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे . पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत समान रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे .शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 पासून मोफत गणवेश योजनेच्या माध्यमातून शासनाचे वतीने शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गदामार्फत शिलाई करून एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून दिले जाणार आहे .या योजनेअंतर्गत पात्र .असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक रंग व एक दर्जा असलेल्या सारख्याच गणवेशाच्या लाभ देण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत .यंदाचे शैक्षणिक सहस्त्र १ जुलैपासून सुरू होणार असल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषद नगर परिषद चे १६१ शाळातील इयत्ता पहिली ते आठवीतील दहा हजार आठशे तेरा विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण केले जाणार आहे .

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )