पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कसली कंबर

वाशिम शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेली संत श्री गजानन महाराज पालखी पायी वारी यावर्षी १९ जून ते २३ जून या कालावधीत वाशिम जिल्ह्यात असल्याने अंदाजे ७०० ते १००० भाविक प्रत्येक पालखी थांब्यावर उपस्थित राहणार असल्याचे गृहीत धरून त्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत प्रभावी व गुणात्मक आरोग्य सेवा दिली जाणार आहे. याकरिता आरोग्यसेवा व्यवस्थापनाचे नियोजन प्रतिबंधात्मक व उपचारात्मक पध्दतीने करण्यात आले आहे.

१९ जून रोजी वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे श्रींच्या पालखीचे आगमन होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी डव्हा येथे मुक्काम असणार आहे. २० जून रोजी सकाळी श्रींची पालखी डव्हा येथून प्रस्थान करून मालेगाव येथे थोडा वेळ थांबेल व तेथून प्रस्थान करून रात्री शिरपूर येथे मुक्काम करेल. २१ जून रोजी सकाळी श्रींची पालखी शिरपूर येथून प्रस्थान करून चिंचाबांपेन येथे थोडा वेळ थांबेल व तेथून प्रस्थान करून रात्री मसलापेन येथे मुक्काम करेल. २२ जून रोजी सकाळी श्रींची पालखी मसलापेन येथून प्रस्थान करून किनखेड येथे थोडा वेळ थांबेल व तेथून प्रस्थान करून रात्री रिसोड येथे मुक्काम करेल. २३ जून रोजी सकाळी श्रींची पालखी रिसोड येथून प्रस्थान करून हिंगोली जिल्ह्यातील पानकण्हेरगाव येथून वारी हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करेल.

मेडशी ते पानकण्हेरगाव या पालखी मार्गावर टोल फ्री वारकऱ्यांसोबत आदराने व

नंबर १०८ व १०२ च्या रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या शुध्द पुरवठ्यासाठी पालखी मार्गावरील पाण्याचे स्त्रोतांचे पाणी शुद्धीकरण करण्यात आले आहे. तसेच वारंवार पाणी तपासणी करण्याकरिता आरोग्यदूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी मार्गावर कीटकजन्य आजाराचे प्रतिबंधासाठी धूर फवारणी करण्यात आली आहे. तसेच मुक्कामाचे ठिकाणची स्वच्छता करण्यात आलेली आहे. जागोजागी वैद्यकीय सेवा उपलब्धतेबाबत आवश्यक अधिकारी यांचे नाव व संपर्क नंबर बॅनरवर प्रदर्शित करण्यात येत आहेत. या मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. या ठिकाणी आरोग्यविषयक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून विविध ठिकाणी आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. पालखी मार्गावर ‘आरोग्यदूत’ म्हणून आरोग्य कर्मचारी यांना विशिष्ट गणवेशात नियुक्त करण्यात आले आहेत. मेडशी येथे पालखीचे आगमनानंतर मुक्कामाचे ठिकाणी सर्व पाहणी करून उपचार केंद्राचे नियोजन कर्मचारी ड्युटीचे नियोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांसाठी पिण्यासाठी असलेले पाणी तपासणी तसेच वारकऱ्यांच्या जेवणाबाबतही वेळोवेळी पाहणी करण्यात येणार आहे. सौजन्याने बोलणे बाबत जिल्हा आरोग्य

अधिकारी डॉ.पी. एस. ठोंबरे यांनी सर्वांना सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच पालखी सोहळ्यामध्ये प्रभावी व गुणात्मक आरोग्य सेवा देण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी दिल्या आहेत. श्रींच्या पालखी मार्गावर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ठीक ठिकाणी आरोग्य उपचार केंद्र तयार करून त्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.

श्रींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नियोजनुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांचे सहाय्याने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विजय काळे यांनी पालखी मार्गावर आरोग्य विभागामार्फत सर्व सेवा पुरविणेबाबतची तयारी पूर्ण केली आहे. पालखी सोहळ्या दरम्यान कुठलीही साथ उद्भवू नये याकरिता जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मोबीन खान व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राम हरी बेले यांच्या देखरेखीखाली आरोग्य यंत्रणा अथक परिश्रम घेत आहे. शिवाय वारीचे औचित्य साधून विविध साथरोगांबद्दल व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाबद्दल जनजागृती तथा माहिती प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्यामार्फत आरोग्य जनजागृती करण्यात येत आहे.

https://bharatgarjana.com

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )