३२ वर्षीय वकिलाचा उपचारादरम्यान मृत्यू – डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची चर्चा
कारंजा लाड – शहरातील नेवीपुरा भागातील एका वकिलाचा नागपूर येथे उपचारादरम्यान १८ जून रोजी सकाळी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. अॅड. सुरज राजेंद्र मिश्रा असे मृत्यू झालेल्या वकिलाचे नाव असून ते नेवीपुरा भागातील रहिवासी होते.
सूत्रांच्या माहितीनुसार अॅड. सुजर मिश्रा यांना उपचारासाठी प्रथम कारंजा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आणि अकोला येथून नागपूर येथे खाजगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु नागपूर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहरात सुरज मिश्रा यांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याची चर्चा सुरू असल्याने आरोग्य विभागाने नेवीपुरा भागात दोन टीमच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केले असून, सर्वेक्षणाअंती अहवाल दिला जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे जाधव यांनी दिली आहे. अर्वी. अॅड. सुरज मिश्रा यांच्या पत्नी सुद्धा वकील असून, मृत्यु पश्चात त्यांचे मागे पत्नी व दोन मुली आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.