अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बुऱ्हान बेनिवाले यांचे निधन 

अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बुऱ्हान बेनिवाले यांचे निधन 

वाशीम : (दि. 20 जून )

तालुक्यातील सुरकंडी येथील रहिवासी असलेले आणि राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदांवर सेवा देऊन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त असलेले बुऱ्हान रन्नू बेनिवाले यांचे दि. 20 जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षांचे होते. 

    सुरकंडी या छोट्याश्या गावातील शेतकरी कुटुंबातील असलेले बुऱ्हान बेनिवाले हे स्वातंत्र्योत्तर काळातील  गावातूनच नव्हे तर संपूर्ण परिसरातून एकमेव अधिकारी होते. त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात दारूबंदी निरीक्षक तसेच विविध वरिष्ठ अधिकारी पदांवर राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये  सेवा दिली. ते अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले.  सेवानिवृत्तीनंतर त्यांनी गाव व परिसरातील अनेक मुलांना मार्गदर्शन करून शासकीय नोकरीचा मार्ग दाखविला. दारूबंदी अधिकारी म्हणून त्यांचा जिल्ह्यात लौकिक होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अशातच  दि. 20 जून रोजी सकाळी वाशीम शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील आपल्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सुरकंडी गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी, चार भाऊ, एक बहीण, एक मुलगा व तीन मुली तसेच नातू पनतू असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा वाशीम येथील राहत्या घरून निघून सुरकंडी येथील कब्रस्तान येथे सायंकाळी 5 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )