आंजी येथील नाला बंदीच्या कामाकडे दुर्लक्ष

आंजी येथील नाला बंदीच्या कामाकडे दुर्लक्ष

प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना जाग केव्हा येईल

प्रतिनिधी:- वैभव पोटवडे

राळेगाव तालुक्यातील आंजी गावाला लागून नाला आहे दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला मोठ्या प्रमाणात पुर येतो त्यामुळे गावात पाणी शिरुन अनेक घरांचे नुकसान होतात त्यामुळे आंजी गावकऱ्यांनी व ग्रामपंचायत शासनाकडे नाला बंदीची मागणी केली होती तर २०२३ पासून नालाबंदीचे काम मंजूर असून अजुन पर्यंत काम चालू केले नाही त्यामुळे मागच्या वर्षी २५ घरात पुराचे पाणी शिरुन लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व या वर्षी जुन महिन्याच्या शेवटी दोन दिवस पाऊस आला व नाल्याला पुर आला होता अजुन तीन चार महिने पावसाळा आहे त्यामुळे आंजी गावाचं अजुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही नाला बंदीच्या कामासाठी आंजी ग्रामपंचायतने वारंवार प्रशासनाला कळविले तरी दुर्लक्ष करित आहे व आंजी गावाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही फक्त निवडणूक आली का आंजी गाव दिसते असे नागरिकांमध्ये बोले जात आहे नालाबंदीचे काम न केल्यामुळे या वर्षी पुराच्या पाण्यामुळे आंजी येतील नागरिकांचे जे नुकसान होईल त्याला लोकप्रतिनिधी व प्रशासन जबाबदार राहील सर्व नुकसानग्रस्त लोक तहसील कार्यालयात ठिय्या मांडून बसु असा इशारा आंजी येतील नागरिकांनी दिला आहे

*बॉक्स*
आंजी येथील नाला बंदीच्या कामासाठी तीन वर्षांपासून मागणी चालू होती पण प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देत नव्हते आता २०२३ ला मंजुरात मिळाली तरी नाला बंदीचे काम चालू केले नाही वारंवार ग्रामपंचायत प्रशासन ला माहिती दिली तरी दुर्लक्ष आहे या पावसाळ्यात जर आंजी गावाचे नुकसान झाले तर सर्व नागरिकांना घेऊन तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार
निलेश पिंपरे ग्रामपंचायत सदस्य आंजी

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )