१५ व्या वित्त आयोगाचा खर्च कमी

१५ व्या वित्त आयोगाचा खर्च कमी

वाशीम – पंधरावा वित्तर्लीवसशीं

आयोगामध्ये कमी खर्च असलेल्या ग्रामसेवकाची सुनावणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांच्या दालनात ९ जुलै संपन्न झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी मागील महिन्यामध्ये जिल्ह्यातील सर्व विकास अधिकारी (डि.ओ.) यांनी मॅरेथॉन आढावा सभा घेतली होती.

त्या सभेत त्यांनी १५ व्या र्लीवसशींवित्त आयोगाच्या खर्चामध्ये उदासिनता खपवुन घेणार नाही, असा इशारा दिला होता. तसेच ७० टक्के पेक्षा कमी खर्च झालेल्या ग्रामपंचायतींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी सहा तालुयामधील कमी खर्च असलेल्या ग्रामसेवकांना बोलावून त्यांची कान उघडणी केली. जिल्ह्यातील सहा तालुयामधील ३० टक्के पेक्षा कमी खर्च असलेल्या तब्बल ५० ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना आपल्या दालनात

बोलावुन त्यांची सुनावणी घेतली होती. ७० ट्यापेक्षा कमी खर्च का अशी विचारणा करुन त्यांना कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. कमी खर्च होण्याची कारणे जाणुन घेऊन १५ वित्त आयोगामध्ये शंभर टक्के खर्च करण्याबाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )