नियमित रोजगार सेवक नसल्याने रोजगार हमीचे तीन तेरा

ग्रा. पं. रोहनामध्ये नियमित रोजगार सेवक नियुक्त करण्याची मागणी

मानोरा तालुयातील रोहणा येथील रोजगार सेवक यांची कायम स्वरुपी नियुक्ती करून लाभार्थी यांचे प्रलंबित सिंचन विहिरीचे काम मार्गी लावावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात रोहणा येथील शरद देशमुख यांनी कोलार येथील तात्पुरता रोजगार सेवक यांची नियुक्त केली आहे. त्यांनी वनीकरण व सिंचन विहीरीचे प्रस्ताव व जीओ टॅगींग करुन ग्रापं कार्यालयाच्या कपाटात ठेवले आहे.

फाइल्स कुलूपबंद कपाटात ठेवल्यामुळे लाभार्थी यांना लाभ मिळणे कठीण झाल्याचे लेखी निवेदनात नमूद केले आहे. वनीकरण, सिंचन विहिरी, ग्राम पंचायतचे दस्तावेज ग्रामपंचायत पातळीवर सांभाळणारे रोजगार सेवक यांनी काही कारणास्तव रोजगार हमी राजीनामा दिला होता परंतु तो योजनेअंतर्गत शासनाकडून मंजूर न झाल्यामुळे तो परत अनुदान प्राप्त सिंचन विहिरीच्या घेण्यात आला. राजीनामा

दिलेल्या रोजगार सेवकास मारण्याची धमकी दिल्यामुळे
जीवास धोका निर्माण झाला आहे आहे. तसेच या ग्रामपंचायत मधील प्रलंबित प्रकरणे निकाली
काढण्यात यावी अशीही मागणी देशमुख यांनी संवर्ग विकास
अधिकार्यांकडे करून स्थानिक ग्राम पंचायत अखत्यारीतील
नागरिक यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )