यूजीसी नेट परीक्षा रद्द
नवी दिल्ली मंगळवारी ( १८ जून रोजी) झालेली युजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा पुन्हा एकदा नव्याने घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढत यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. पेपर फुटल्याचा संशय असल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचं शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आहे. तसेच नेट परीक्षेची पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी ही परीक्षा रद्द केल्याचंही शिक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण सीबीआयकडे
सोपविण्यात आलं असून पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असंही शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे.
CATEGORIES DELHI
TAGS Hot News