जागतीक योग दिनानिमित्त योग महात्सवाची वाशिममध्ये जय्यत तयारी

वाशिम – आगामी २१ जून रोजी जागतीक योग दिनानिमित्त पतंजली परिवार, आर्ट ऑफ लिव्हींग परिवार, नेहरु युवा केंद्र, ओम शांती ब्रम्हकुमारी अध्यात्मीक योग केंद्र तथा कामगार कल्याण मंडळ आणि विविध सहयोगी संघटनांच्या वतीने स्थानिक मन्नासिंह चौक येथील स्वागत लॉन येथे योग महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. त्या अनुषंगाने भारत स्वाभिमान पतंजलीचे जिल्हाध्यक्ष तथा योग तज्ञ डॉ. भगवंतराव वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली १३ जून रोजी बैठक घेण्यात आली.

होणार्या योग महोत्सव कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील नामवंतांना निमंत्रित करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. तसेच स्वागत लॉन येथे सकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यत निशुल्क योगशिबीर प्रशिक्षण ठेवण्यात आले असल्याची माहिती डॉ. भगवंतराव वानखेडे यांनी दिली. या योग प्रशिक्षण शिबीराचा सर्व वाशिमकर जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी शंकर उजळे, महिला पतंजली समितीच्या सदस्या सौ. दिपाताई वानखेडे, संगीताताई आगामी २१ जून रोजी साजरा राजगुरु, साधनाताई, वर्षाताई,

मालतीताई, अघमताई, गोरलेताई, गायत्री परिवार, पुरुषोत्तम दुरतकर, विजय पवार, श्यामभाऊ, राजेश बोरकर, झामरे, अवगडे, पंत, नितीन, गोपाल महल्ले, पंचभाई, दाभाडे, जाधव, गजानन, राजगुरु, मुसळे, बेंद्रे, बाप्ती जाना, दत्ता टाकळकर, प्रा. कहाते, प्रा. दिपक एकाडे, रवि एकाडे यांच्यासह कार्यकर्ता महिला उपस्थित होते. सर्व संघटनांच्या वतीने भव्यदिव्य स्वरुपात भव्य कार्यक्रम करण्याचा संकल्प बैठकीमध्ये मार्गदर्शन करतांना बालरोग तज्ञ तथा आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रमुख डॉ. हरिष बाहेती यांनी सांगीतले. आभार प्रदर्शन तथा शांती पाठानंतद बैठकीचा समारोप करण्यात आला.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )