उद्यापासून राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनिष डांगे यांच्या नेतृत्वात दिव्यांगांचे धरणे आंदोलन
प्रतिनिधी/
वाशिम : दिव्यांगांच्या विविध प्रलंबीत मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे मनिष डांगे यांच्या नेतृत्वात दिव्यांगांच्यावतीने 29 जुलै पासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
दिव्यांग योजनांची कसल्याच प्रकारची अमंलबजावणी होत नसल्याने व दिव्यांग व्यक्तींना कोणत्याच प्रकारचे लाभ मिळत नसल्यामुळे दिव्यांगांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रशासकीय अधिका-यांच्या असंवेदनशिल कार्यशैलीमुळे अपंग दशोधडीला लागतोय की काय? अशी भिती निर्माण झालेली असून त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील तमाम अपंगांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार दिव्यांगांना लोकसभेपासुन तर विधान सभेवर राजकीय व सहकार क्षेत्रात नामनिर्देशनाव्दारे आरक्षण मिळावे, दिव्यांगांना शिक्षण, पदविधर स्वतंत्र मतदार संघाप्रमाणे दिव्यांग जनगणना आधारीत स्वतंत्र दिव्यांग मतदार संघ निर्माण करावा त्याव्दारे निवडणूकीच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात दिव्यागांना दिव्याग लोकप्रतिनित्व बहाल करावे ,महाराष्ट्र शासनाने राज्य दिव्याग कल्याण निधीची निर्मिती करावी. व प्रत्येक वर्षी राज्य अर्थसंकल्पात 5 टक्के निधिची तरतूद करावी, दिव्यागांच्या शाळा व कर्मशाळा यांचा बांधिल खर्च अपंग कल्याण निधीमधून करणे थांबवावे. त्यांना संबधित शालेय शिक्षण व कौशल्य विकास विभागांकडे वर्ग करण्यात याव्यात, महाराष्ट राज्यातील बोगस अपंग शाळा, वसतीगृह व कर्मशाळा यांची चौकशी करून त्या त्वरीत बंद कराव्यात, दिव्यांग प्रवर्गाचा महाराष्ट शासनाच्या उदयोग धोरणात संपुर्ण समाविष्ट करावा. व त्याना कमी मानवी निर्देशाक नुसार ड प्रवर्गातील अनुज्ञय सवलतींचा लाभ मिळावेत, दिव्यागांचा शासकीय कार्यालयीन खरेदी धोरणात समावेश करावा व त्यांना शासकीय कार्यलयीन खरेदीमध्ये 5 टक्के बंधनकारक आरक्षण देण्यात यावे. सदर आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थाना बंधनकारक करण्यात यावे, महाराष्ट शासनाने यापूढे अपंग क्षेत्रासाठी अनुज्ञेय सवलती अथवा लाभ देतान संबधित संस्थांमध्ये दिव्यांगाचा किमान 51 टक्के सहभाग अथवा मालकी असावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.