तांत्रिक कामगार युनियनचे
साखळी उपोषण सुरू
वाशीम – विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेचे महावितरण प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरुध्द २४ जुलै पासून विभागीय व मंडळ कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले की, विभागीय कार्यालयामार्फत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले आर्थिक देयके, अतिकालिक कामाची देयके, जि.ओ. ७४ ची प्रकरणे, कर्मचार्यांची बदली देयके, तसेच १८ फेब्रुवारी २०२४ रोजी मंगरुळनाथ उपविीीगा अंतर्गत येणार्या ३३
के. व्ही. उपकेंद्र पेठ खदानूपर अंतर्गत दाभा गावठाण फिडरवर रोशन रामेश्वर जाधव (तंत्रज्ञ) यांचा अपघात प्रकरण, कारंजा उपविभागा अंर्तत मंजूर पदापेक्षा अतिरिक्त नियुक्ती प्रकरण आदीसह विविध मागण्यासंदर्भात तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात प्रादेशिक उपाध्यक्ष गणेश गंगावणे, मंडळ अध्यक्ष मनोज पूसांडे, सचिव प्रकाश ठाकरे, विभागीय सचिव सुरेश शेळके, विभागीय अध्यक्ष विशाल लांडगे यांच्यासह बहुसंख्येने तांत्रिक कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.