द वर्ल्ड स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
आनंदी आयुष्य, उत्साही मन आणि निरोगी शरीर ही त्रिसूत्री फक्त योगामुळे शक्य – सौ. भावना सुतवणे
वाशिम – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाबाबत जागृती आणि रुचि निर्माण व्हावी या हेतूने येथील कला, क्रीडा, खेळ, सांस्कृतिक क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली शिक्षणसंस्था द वर्ल्ड स्कूल येथे २१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष सुनील कदम व पंकज बाजड तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भावना सुतवणे, उपमुख्याध्यापक मनोज सुतवणे, समन्वयक माधुरी गोरे व प्रतिभा मालस तसेच योगतज्ञ नारायण ठेंगडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
आपल्या मनोगतात सौ. भावना सुतवणे यांनी योगदिवस ही विश्वाला भारताकडून मिळालेली देणगी आहे असे प्रतिपादन केले. शाळेतील योगतज्ञ, खेळ प्रशिक्षक नारायण ठेंगडे यांनी विविध सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, विविध आसने व योगाभ्यास उपस्थित शिक्षकवृंद आणि निवडक विद्यार्थी यांच्याकडून करून घेतले. कार्यक्रमाचे नियोजन नारायण ठेंगडे, ज्ञानेश्वर उखळे, प्रशांत शेळके, अनंत बाजड, प्रवीण डोंगरदिवे, गजानन ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला माधुरी गोरे, प्रतिभा मालस, पूजा माने, शितल तिवारी, नूतन कव्हर, सपना सुर्यवंशी, गायत्री पांडे, श्रद्धा काटकर, पूनम बुंधे, पल्लवी जोशी, सुरेखा झामरे, किरण वैद्य, पायल मुराडे, भरत गायकवाड, केशव तिरके, सिमा कड, प्रांजली सरनाईक, जसप्रीत सेठी, आरती देव, सचिन लहाने, दुर्गाप्रसाद अंभोरे, वैशाली वाघमारे, अर्चना देवगिकर, सुरेखा पट्टेबहादूर, सविता रत्नपारखी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संदिप खडसे यांनी आपल्या सुंदर शैलीतून केले. योगादिनाच्या व विश्वसंगीत दिनाच्या निमित्ताने शाळेतील चित्रकला विभाग प्रमुख भारत गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.