दिव्यांगाच्या भव्य मोर्चा बाबत मानोरा तालुकास्तरीय बैठक संपन्न २९ अगस्ट रोजी होणाऱ्या दिव्यांगाच्या मोर्चा मध्ये उपस्थित राहा-रमेश चव्हाण
रिसोड – आज रिसोड तालुक्यातील दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी रिसोड तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक शासकीय विश्राम गृह येथे दिव्यांगाचे खंबीर नेतृत्व मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात गोपाल मोटे, रमेश चव्हाण, गुलाब मानवर, राजाराम राऊत, गोकुळ जाधव, नारायण नोळे मनोज इंगळे यांच्या उपस्थितीत सपन्न झाली यावेळी बोलतांना महाराष्ट्र शासनानेचे लक्ष वेधण्यासाठी
दिव्यांगाचा भव्य मोर्चा वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार आहे या मोर्चा मध्ये प्रमुख माघण्या लोकसभा ते ग्रामपंचायत पर्यंत आरक्षण, दिव्यांगाला सरसकट घरकुल योजना, दिव्यांगाना ५००० माधन, जिल्हापरिषद पचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिक, नगरपाचायत महानगर पालिका मध्ये ५ % निधी खर्च करावा, दिव्यांगाला सरसकट घरकुल योजना द्या, अपंग वित्त विकास
महामंडळचे कर्ज माफ करा, २०० स्केवर फुट जागा दिव्यांगाना व्यवसाय करण्यासाठी द्या या माघण्या साठी सर्व दिव्यांग बंधू, भगिनीं, विधवा, परिकत्या यांनी उपस्थिती राहावे असे आव्हान करण्यात आलेयावेळी भाऊराव देवराव नाटकर, रंजना सुरुशे, नंदा सदाफळे, अनिल चव्हाण, वर्षा गावडे, भीमराव राठोड, केशव राऊत, नंदकिशोर शेंडे, शिला चक्रनारायण, किसन आवारे, दत्ता बुदे, पंडित आदी होते