![दोन गटांत तुंबळ हाणामारी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल दोन गटांत तुंबळ हाणामारी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल](https://bharatgarjana.com/wp-content/uploads/2024/07/download.png)
दोन गटांत तुंबळ हाणामारी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कारंजा लाड – कारंजा शेताच्या धुर्यावर गवताचा पुंजा टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तालुक्यातील उंबर्डाबाजार शेतशिवारात घडली. या घटनेत दोन्ही गटातील सुमारे ६ जण जखमी झाले असून, एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कारंजा पोलिसांनी माहितीनुसार ग्रामीण दिलेल्या फिर्यादी किशोर बळीराम तारगे (वय ४४) हे शेतात काम करत असताना त्यांच्या वहिनी हर्षा ज्ञानेश्वर तारगे यांनी आरोपींना शेतात गवताचा पुंजा टाकण्याचा जाब विचारला असता त्यांनी फिर्यादी व त्यांचा पुतण्या आणि भाऊ यांना लोखंडी गज, काठी व काळा वायरने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी सुभाष चंपत हळदे, धनंजय दयाराम खराटे, दयाराम शंकर खराटे तुळशीराम चंपत हळदे यांच्याविरुद्ध कलम ११८(१), ३५२, ३५१ (२), ३५१(३), ३ (५) गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसर्या गटाकडून तुळशीराम चंपत हळदे (वय ४५) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपींनी फिर्यादीचा भाऊ सुभाष हळदे, पत्नी दीपाली हळदे व मामेभाऊ धनराज दयाराम खराटे यांना लाथाबुक्या, शिवळ बेल्डी मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली असे नमूद करण्यात आले आहे. त्यावरून किशोर बळीराम तारगे, ज्ञानेश्वर बळीराम तारगे, ऋषिकेश ज्ञानेश्वर तारगे, कार्तिक किशोर तारगे यांच्याविरुद्ध कलम भा. न्या.सं. ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३५१ (३), ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.