पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मिडीयाचे आंदोलन
मुख्यमंत्र्यांना दिले मागण्यांचे निवेदन
वाशिम (प्रताप नागरे कार्यकारी संपादक) साप्ताहिक वृत्तपत्रांसह दैनिके, न्यूज चैनल व इतर प्रसारमाध्यमांच्या विविध प्रलंचित मागण्यांच्या पुर्ततेसाठी देशात क्रमांक एक वर असलेल्या व्हॉईस ऑफ मिडीया साप्ताहिक विगच्या चतीने ४ जुलै रोजी राज्यस्तरीय आंदोलनांतर्गत संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांच्या मार्गदर्शनात व साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन धामगे व प्रदेश उपाध्यक्ष संदीप पिंपळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाध्यक्ष विनोद तावडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
– निवेदनात नमूद आहे की, राज्जाभरातील दैनिके, साप्ताहिके, न्युज चैनल, न्युज पोर्टल, युट्युब पोर्टल आदींच्या विविध मागण्यांसंदर्भात व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतीने संपुर्ण राज्यात एकाच वेळी राज्यस्तरीय आंदोलनांतर्गत धरणे आंदोलने राबविण्यात आले. त्यानुस्ता पत्रकारांच्या मागण्या आज रोजी शासनदरबारी प्रलंबित – आहेत. या मागण्यांच्या पुर्ततेसाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुराचा करण्यात येत आहे. मात्र शासनाकडून पत्रकारांवर अन्याय केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पत्रकारांच्या मागण्यांमध्ये, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणेच सामाहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे. साप्ताहिक वृत्तपत्राची द्वीवार्षिक पडताळणी पाच वर्षात करावी. साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीची दरवाढ करावी. अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळात परिवारासह सवलत देण्यात खत्री, रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती पारकांना पुन्हा सवलत सुरु करावी. पत्रकारांसाठी आरोग्य विमा व मोफत मध्ये उपचाराची सचलत देण्यात बाची. उवरएनआय कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. दैनिकांप्रमाणे साप्ताहिकांना विशेष प्रसिध्दीच्या जाहिराती देण्यात याव्या, सर्व दर्शनी जाहिरातीचा
आकार ८०० चौसेमी, अटी रद्द करण्यात वाव्या. कोरोनापासून बंद करण्यात आलेली रेल्वे प्रवासातील सवलत पुर्ववत सुरु करण्यात बाबी, न्युजप्रिंट कील जीएसटीची अट रह करण्यात याची. सर्व साप्ताहिकांना शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या जाहिराती देण्यात याव्या, आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत,
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी निवेदन स्विकारले, निवेदन देतांना व्हॉईस ऑफ मिडीयाचे विदर्भ कार्याध्यक्ष विठ्ठल देशमुख, विदर्भ संघटक नंदकिशोर वैद्य, जिल्हाध्यक्ष भागवत
मापारी, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल पाटील, जिल्हा सचिव धनंजय कपाले, जिल्हा संघटक उता महाले, जिल्हा प्रवक्ता देर इंगोले, इलेक्ट्रॉनिक विंगचे किल्ला उपाध्यक्ष गणेश भोहळे, अतिश देशमुख, मंकेश माळी, जिल्हा सचिव रमेश उंडाळ, साजन धाबे, किरण पड़धान, मालेगाव तालुकाध्यक्ष अजय चोधमल, मानोरा तालुकाध्यक्ष वसंत राठोड, सचिव योगेश देशमुख, उपाध्यक्ष अनिल राठोड, संघटक निखिल वानखडे, कार्याध्यक्ष राजु ठाकरे, कोषाध्यक्ष हरिष खडकीकर, बाबाराव कोडापे, बालाजी ठेंगडे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.