फुलउमरी येथे जलजन्य आजाराने डोकेवर काढले
प्रशासकाचे ग्रापं कडे दुर्लक्ष * उपाययोजना शुन्य
मानोरा फुलउमरी सह परिसरात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाळ्याचे दिवस असताना दिवसभर कधी ढगाळ वातावरण, कधी ऊन, तर कधी रिमझिम पाऊस असे वातावरण पाहावयास मिळत आहे. वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. व्हायरल इन्फेशन, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आदीने नागरिक त्रासले आहेत. खाजगी रुग्णालय ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे.
फुलउमरी सह मानोरा तालुयातील १४ ग्रामपंचायतचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपल्यामुळे १३ एप्रिल पासून ग्रामपंचायत वर प्रशासकाची
नेमणूक करण्यात आली. फुलउमरी येथे पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी बी. बी. पदमने यांची नेमणूक करण्यात आली आहे. तीन महिन्याचा कार्यकाळ लोटला असतांना अजूनही पदमने यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही. गावात असलेल्या अनेक भागातील नाल्यातील गाळ काढल्या गेले नाही. फक्त मुख्य मार्गातील बसस्थानक ते गजानन गवळी यांचे घरा समोरील नालीचे थातूर मातुर गाळ काढल्या गेले. गावातील सार्वजनिक विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकणे,
वृक्षारोपण आदी कामे अजून झाली नाही. पावसाळा असल्याने वातावरणात व्हायरल इन्फेशन होण्याची शयता बळावत आहे. सततच्या वातावरण बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप, घशाचे आजार वाढत आहेत. अशा वातावरणामुळे डास, विविध कीटक, विषाणूंची झपाट्याने वाढ होते. त्यामुळे साथीचे आजार वाढू नये म्हणून धुरळ फवारणी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात दूषित पाणी पिण्यात आल्यास त्यामुळे कावीळ, डायरियासारखे आजार देखील होतात. त्यामुळे ब्लिचीन पावडरचा वापर विहित होणे गरजेचे असतांना प्रशासक ग्रामपंचायत कडे फिरकले नसल्याने गावाकर्यातून आश्चर्य व्यक्त होत आहे.