मोतसावंगा धरण तुडुंब
मंगरूळनाथ शहराला पाणी पुरवठा करणारे मोतसावंगा जलप्रकल्प १०० टक्के भरल्याने नदीकाठी चार गावांना सतर्कतेचा इशारा लघु सिंचन विभागा च्या वतीने देण्यात आला आहे.
तालुयातील मौजे मोतसावंगा येथील अडाण नदीवर १९७२ साली या जल प्रकल्पाची उभारणी केली असून, सदर जलप्रकल्प शेती सिंचन तसेच मंगरूळनाथ
शहराची तहान भागवितो या जलसाठ्यात ३१ जुलै रोजी मोत सांवगा, रामगाव परिसरात ढगफुटी सदृष पाऊस झाल्याने हा जल प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे शहरा चा पाणी प्रश्न मिटला आहे. परंतु सध्यस्थितीत सांडव्यातून विसर्ग सुरू आहे संततधार अतिवृष्टी स्थिती असल्याने प्रकल्प पाणलोट क्षेत्रातून येणारे पावसाचे पाणी सांडव्याद्वारे
नदी नाल्यातून वाहत आहे. निंबी, मानोली, दुधखेडा सावंगा येथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा लघु सिंचन विभागाने दिला आहे. तसेच संबंधित ग्राम पंचायतीने अशा प्रकारची नोटीस ग्राम पंचायत फलकावर लावण्याचे आदेशही दिले आहेत. याबाबतचे पत्रही पोलिस स्टेशन, उपविभागीय अधिकारी यांच्यासह वरिष्ठांना दिले आहे.