लोक अदालतीमध्ये २७३ प्रकरणांचा निपटारा

लोक अदालतीमध्ये २७३ प्रकरणांचा निपटारा

कारंजा लाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात २७ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये एकूण २७३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला ज्यामध्ये १ कोटी ८५ लाख ५३ हजार ४७० रुपये वसुली करण्यात आली. कारंजा दिवाणी फौजदारी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश पि. ढी. देवरे व सहन्यायाधीश एस एन पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कारंजा तालुका वकील संघाचे अध्यक्ष निलेश पाटील कानकीरड यांचे उपस्थिती मध्ये आयोजित या लोक अदालतीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यामध्ये मोटर वाहन कायदा २० प्रकरणे रक्कम ५२०० रुपये, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅट

३८ प्रकरणे रक्कम १ कोटी ६० लाख ६६ हजार ८४७ रुपये, दिवाणी प्रकरण ३, रक्कम १४ लाख ४७ हजार ८८१, गुन्हा कबुली १७० रक्कम चाळीस हजार दोनशे, दाखल पूर्व प्रकरणे रक्कम रुपये ९ लाख ९३ हजार ३४२ अशा एकूण १ कोटी ८५ लाख ५३ हजार ४७० रकमेची वसुली या प्रकरणांमधून झालेली आहे. या लोकअदालतीला कारंजा तालुका वकील संघ पदाधिकारी व सदस्य कारंजा पंचायत समिती अंतर्गत च्या ग्रामपंचायत, विविध सेवा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँक, पतसंस्था, पोलिस विभाग, कारंजा न्यायालय अधीक्षक बेलखेडे व कर्मचारी वृद, पक्षकार यांनी सहकार्य केले.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )