समृद्धीवर कारचा अपघात दोन महिला गंभीर जखमी

समृद्धीवर कारचा अपघात दोन महिला गंभीर जखमी

कारंजा लाड समृद्धी महामार्ग लोकेशन १७५ कार्ली यावर्डी दरम्यान आज २३ जून रोजी दुपारी दिड वाजतादरम्यान शेगाववरुन दर्शन करून समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जात असताना कार क्रमांक एमएच ३१ एफई ९८२० ही समृद्धी महामार्ग लोकेशन १७५ वर कारचा समोरचा टायर अचानक फुटल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

अपघाताची माहिती मिळताच लोकेशन १०८ समृद्धी | महामार्ग पायलट आतिश चव्हाण, डॉ. सोहेल खान व जगतगुरु | नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिका सेवा, रुग्णसेवक नितीन पाटील | मानकर व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख तात्काळ | घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी जखमी रुग्णास उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. या अपघातामध्ये शरयू नागरे (वय २८) व मेघा नागरे (वय ४८) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून, प्रथमोपचारानंतर त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले. यावेळी समृद्धी महामार्ग अग्निशामक दल, एचएससी टीम, समृद्धी महामार्ग महाराष्ट्र सुरक्षा रक्षक हायवे पोलिस घटनास्थळी हजर होते.

CATEGORIES
TAGS
Share This

COMMENTS Wordpress (0) Disqus (0 )